सिनेमाच्या निर्मात्याने आपण लावलेल्या पैश्याला विसरून जावे असं माझ म्हणण नाही.
पण लावलेला पैसा वसूल व्हायलाच हवा यासाठी तडजोड करू नये दिग्दर्शकाला करायला लावू नये.
उत्कृष्ट सिनामाची व्याख्या खूप सोपी आहे.
म्हणजे एक छान कथा चांगल्या प्रकारे सांगितलेली ! चित्रपटात हि कथा सागणारा असतो दिग्दर्शक !
आणि त्याने निवडलेली अभिनेते मंडळी. कमेरामन लोकेशन सगळ्या गोष्टी आणि त्यांची काम मिळून सिनेमा तयार होतो.
प्रत्येकाला आपल काम आपला भाव वाढवून घ्यायचा असतो. त्यासाठी प्रत्येकजण काहीनाकाही शक्कल लावतो.
आणि ती त्याची आयडिया बहुतेक वेळा कथेला मारक असते. दिग्दर्शकाने ते कितपत चालवून घ्यावे याला मर्यादा असते.
ह्याकडे निर्मात्याला लक्ष देणे गरजेचे असते.
आपली टीम अशी झाली पाहिजे जी आपण निवडलेल्या कथेसाठी जीव लावून काम करेल.
प्रेक्षक सिनेगृहात निर्मात्याला सुपरस्टार ला किंवा अश्या कुणालाही पाहायला येत नाही.
(त्याचा आधीचा नाव लौकिक पाहून येते) कि मला एक छान कथा अनुभवायला मिळेल.
पैसा प्रसिद्धी साठी काम केले तर ते सारे हरवते.
पण कथेसाठी काम केल कि मग नाव लौकिक मिळत जातो. आणि प्रत्येकाला हवी ते मिळते.
पैसा प्रसिद्धी ...........................!!!
डॉं.मुरलीधर भावसार
18/01/2013
18/01/2013
No comments:
Post a Comment