Thursday, January 17, 2013

सिनेमाच्या निर्मात्याने आपण लावलेल्या पैश्याला विसरून जावे असं माझ म्हणण नाही.
पण लावलेला पैसा वसूल व्हायलाच हवा यासाठी तडजोड करू नये दिग्दर्शकाला करायला लावू नये.
उत्कृष्ट सिनामाची व्याख्या खूप सोपी आहे.
म्हणजे एक छान कथा चांगल्या प्रकारे सांगितलेली ! चित्रपटात हि कथा सागणारा असतो दिग्दर्शक ! 
आणि त्याने निवडलेली अभिनेते मंडळी. कमेरामन लोकेशन सगळ्या गोष्टी आणि त्यांची काम  मिळून सिनेमा तयार होतो.
प्रत्येकाला आपल काम आपला भाव वाढवून घ्यायचा असतो. त्यासाठी प्रत्येकजण काहीनाकाही शक्कल लावतो.
आणि ती त्याची आयडिया बहुतेक वेळा कथेला मारक असते. दिग्दर्शकाने ते कितपत चालवून घ्यावे याला मर्यादा असते.
ह्याकडे निर्मात्याला लक्ष देणे गरजेचे असते.
आपली टीम अशी झाली पाहिजे जी आपण निवडलेल्या कथेसाठी जीव लावून काम करेल. 
प्रेक्षक सिनेगृहात निर्मात्याला सुपरस्टार ला किंवा अश्या कुणालाही पाहायला येत नाही.
(त्याचा आधीचा नाव लौकिक पाहून येते)  कि मला एक छान कथा अनुभवायला मिळेल.
पैसा प्रसिद्धी साठी काम केले तर ते सारे हरवते. 
पण कथेसाठी काम केल कि मग नाव लौकिक मिळत जातो. आणि प्रत्येकाला हवी ते मिळते.
पैसा प्रसिद्धी ...........................!!!

डॉं.मुरलीधर भावसार
18/01/2013

सिनेमाची लॉटरी ......

चित्रपट सृष्टीचे आकर्षण खूप जणांना असते. कारण काय असावे तर प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात मिळते.
खूप जास्त पैसा मिळतो. कारण हा असा एक बिझिनेस आहे कि ज्यात एका रुपयाचे १०० रु. होतात किंवा १००० रु. हि होवू शकतात.
त्यामुळे खूप लोक यात उडी घेतात. लॉटरी च तिकीट घ्याव तस. 
लॉटरी च तिकीट विकत घ्यायला काहीही शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते, अगदी तसच !
पण चित्रपट निर्मिती किंवा त्यात काम करणे हे लॉटरी सारखे पूर्णत: नशिबावर अवलंबून नसते.
ह्यात प्रचंड मेहनत करावयाची असते आणि ती अतिशय सहजतेने.
खूप अभ्यास करावयाचा असतो, आणि हा अभ्यास कामी येइलच अस वाटत नाही तरीही.
गमत अशी कि ह्यात एक रुपया लावून एक रुपया सुरक्षित पणे परत निघावा या गोष्टीवर भर दिला तर तो एक रुपया परत मिळत नाही.
कारण तो परत निघण्या साठी जेव्हा तजवीज करू लागतो तेव्हा सृजनशीलता हरवत जाते.
साचेबंद ठरलेले फार्मुले येतात तोच तोच पणा येतो आणि प्रेक्षक चित्रपट गृहातून परत जातो.

डॉ.मुरलीधर भावसार

18/01/2013

सिनेमाच्या निर्मात्याने आपण लावलेल्या पैश्याला विसरून जावे असं माझ म्हणण नाही.
पण लावलेला पैसा वसूल व्हायलाच हवा यासाठी तडजोड करू नये दिग्दर्शकाला करायला लावू नये.
उत्कृष्ट सिनामाची व्याख्या खूप सोपी आहे.
म्हणजे एक छान कथा चांगल्या प्रकारे सांगितलेली ! चित्रपटात हि कथा सागणारा असतो दिग्दर्शक ! 
आणि त्याने निवडलेली अभिनेते मंडळी. कमेरामन लोकेशन सगळ्या गोष्टी आणि त्यांची काम  मिळून सिनेमा तयार होतो.
प्रत्येकाला आपल काम आपला भाव वाढवून घ्यायचा असतो. त्यासाठी प्रत्येकजण काहीनाकाही शक्कल लावतो.
आणि ती त्याची आयडिया बहुतेक वेळा कथेला मारक असते. दिग्दर्शकाने ते कितपत चालवून घ्यावे याला मर्यादा असते.
ह्याकडे निर्मात्याला लक्ष देणे गरजेचे असते.
आपली टीम अशी झाली पाहिजे जी आपण निवडलेल्या कथेसाठी जीव लावून काम करेल. 
प्रेक्षक सिनेगृहात निर्मात्याला सुपरस्टार ला किंवा अश्या कुणालाही पाहायला येत नाही.
(त्याचा आधीचा नाव लौकिक पाहून येते)  कि मला एक छान कथा अनुभवायला मिळेल.
पैसा प्रसिद्धी साठी काम केले तर ते सारे हरवते. 
पण कथेसाठी काम केल कि मग नाव लौकिक मिळत जातो. आणि प्रत्येकाला हवी ते मिळते. 
पैसा प्रसिद्धी ...........................!!!

डॉं.मुरलीधर भावसार 
18/01/2013

Monday, November 28, 2011

तुझ्या केसातल्या तुझ्या केसातल्या काळ्या जाळ्यात मी हरवतो आहे ! मनाच्या खोल डोहात माझा मलाच शोधतो आहे !! धृ !! मला सोडून जाण्याचा विचार मनी आणू नको जराही या पापण्याच्या पिंजर्यात मी तुला सांभाळतो आहे !! १ !! ओळखीचा तरी अनोळखी असा कोण आहेस तू ? शब्द जुळतात गाण्यातले पण सूर विसरतो आहे !! २ !! नको पाहू तू या चेहर्याला अंतराच्या ये ग तळाशी सोडून जीवन अनंतातले मरण स्वीकारतो आहे !! ३ !! मुरली